मुद्रा योजनेत सगळ्यात मोठा घोटाळा औरंगाबादेत - सुप्रिया सुळे

Foto
मोदी सरकार म्हणजे केवळ जुमला सरकार असून या सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मुद्रा योजनेचा मोदी सरकार मोठा गवगवा करते. मात्र, मुद्रा योजनेत सगळ्यात मोठा घोटाळा तर औरंगाबादेत झाला असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. औरंगाबादेत सिल्कमिल्क कॉलनी येथील मदनिया हॉल येथे पक्षाचे कार्याध्यक्ष ख्वाजा सरफोद्दीन यांनी राष्ट्रवादी पश्चिम विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात त्या बोलत होत्या. 

पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, मोदी सरकार जनतेच्या पैशाने जाहिरातीवर खर्च करत आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यांवर हजारो कोटी रुपये खर्च होतात. हाच पैसा सरकारने विधवा महिलांना दिला असता तर त्यांचा आशीर्वाद सरकारला लागला असता. मुद्रा योजनेत मोठ्या प्रमाणात घपला झाला असून पन्नास हजार रुपयात कुठलाही व्यवसाय उभा करता येण शक्य नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे. २०१४ साली आपण मोदींच्या आश्वासनाला फसलो आता मात्र, आपल्याला फसायचे  नाही. निवडणूका या येत राहतात जात राहतात मात्र, यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातो. औरंगाबाची आण, बाण, शान जपणाऱ्या उमेदवारालाच विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. बारामतीआणि पुण्यापेक्षा जास्त विकास औरंगाबादचा हवा असेल तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करा. बारामतीपेक्षा औरंगाबादचा जास्त विकास  करू शकलो  नाही तर पुन्हा मत मागायला येणार नाही अस सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.  

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker